आयुर्वेदात श्वित्र नावाने वर्णन केलेला विकार आपण पांढरे कोड या नावाने ओळखतो. आपल्या देशात कोड असणा-या व्यक्तीकडे बघण्याची समाजाची दृष्टी चुकिची आहे. त्वचेत वैवर्ण्य येणे म्हणजे त्वचेचा सामान्य रंग बदलणे होय. काही तज्ञ याला विकार मानतच नाही. आधुनिक शास्त्रानुसार त्वचेतिल बाह्य स्तरात असणा-या मेलॅनीन नावाच्या रंगद्रव्याच्या अल्पतेमुळे हा विकार उद्भवतो. कोड असणे अनेकवेळा अनुवंशीक असू शकते. हा व्याधी संक्रामक प्रकारातला म्हणजे एका व्यक्तीकडून दुस-याला होणारा नसल्याने भितीचे कारण नसते. या विकारात प्रतयत्नांद्वारे डाग दुर करणे गरजेचे असते. कोड या विकारात स्त्राव येणे,खाज येणे, पुळ्या येणे, वेदना होणे, आग होणे इ. कोणत्याही स्वरुपाची लक्षणे नसतात, केवळ विरुपता येणे एवढेच लक्षण यांत दिसते. विरुपता दिसताच उपचार केल्यास निश्चित फायदा होतो. नवीन उद्भवलेले, थोडया ठिकाणी असलेले कोड लवकरबरे होतात तर जुने झालेले, डोळे-ओठ-हातापायांचे तळवे-जननेंद्रियावर असणारे कोड लवकर बरे होत नाही अथवा तसेच राहतात. ज्या कोडाचे भागातील केस पांढरा झालेलाअसेल ते देखील बरे होण्याची शक्यता नसते. जळालेल्यामुळे देखील पांढरे कोड होण्याची शक्यता असते असा प्रकार मोठया प्रयत्नाने बरा होतो.
जीवनातील अतिकृत्रीमता आणि निसर्गापासून लांब जाणे यामुळे कोड वाढत आहे. अनुवंधिकते शिवाय अनेक कारणं आहेत कि जे कोड उत्पन्न करु शकतात. दही, केळी, मीठ, लोणचे, आंबविलेले पदार्थ अधीक प्रमाणात सेवन करणे तसेच तीव्र तापात चुकिची औषधी घेणे, यकृताचे कार्य मंदावल्यामुळे सार्वदेहिक रक्ताभिसरण कमी होऊन त्वचेच्या रक्तात बदल होणे, कृत्रिम धाग्याचे कपडे वापरणे, पॉलिश केलेला तांदुळ-डाळी यांचासातत्याने वापर, फ्रुट सलाड नेहमी खाणेइ. कारणं कोड उत्पन्न करु शकतात. या व्यतिरिक्त अनेक रुग्णांमध्ये कृमी-जंत हे देखील कारण आहे.
वयस्क व्यक्ती आणि खूप जुने कोड असल्यास उपचारांचा विशेष फायदा होत नाही, परंतु अशा रुग्णांनी रक्त शुद्धीकर औषधी घेतल्यास मर्यादित यश मिळु शकते, अथवा कोड वाढत नाही.
कोडाचे उपचारात प्रमुख दोन भाग पडतात. एक म्हणजे बाह्य उपचार तर दुसरे पोटात घेण्याचे औषध. बाह्य उपचारया प्रकारात विविध प्रकारचे लेप, जळवा लावणे, उन्हात बसणे इ. क्रियांचा समावेश होतो. पोटातून घेण्यात येणा-या औषधांमध्ये कृमिंना नष्ट करण्यात येणारी, रेचक, रक्तशुद्धीकर इ.औषधींचा समावेश होतो. आधुनिक शास्त्रानुसार क जिवनसत्वाच्या आधिक्यामुळे कोड उत्पन्न होऊ शकते, म्हणून आवळा-लिंबु-संत्री-पेरु-मोसंबी यां सारखी क जिवनसत्व अधीक असणारी फळे खाऊ नयेत.
औषधांमध्ये आरोग्यवर्धिनी, त्रिफळा चुर्ण, कृमिमुद्ग रस, कृमिकुठार, विडंगारिष्ट, मंजिष्ठा-अनंतमुळ-बावची-खैरसाल-हिरडा-हळद-बहावा-जाई यांचे चुर्णाचा उपयोग करावा. बावची लेप गोळी लेपनासाठी वापरावी. रुग्णालयीन उपचारात जळवा लावणे, रक्तमोक्षण इ. करावे.
कोड नाहिसे करण्यासाठी करण्यात येणारे उपचार आणि पथ्यापथ्य बरेच दिवस सातत्याने केल्यास फर्क पडू शकतो. कोस पुर्णतः बरे होण्यासाठी ६ महिने ते बरेच वर्ष लागु शकतात.
सामान्यतः कोड असणा-या व्यक्तींनी अतिप्रमाणात मीठ-दही-आंबट पदार्थ, केळी-पाव-ईडली-केक, सोडा असणारे पदार्थ, विरुद्ध अन्न इ. वर्ज्य करावे.